महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची लागण - कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्र्यूडेयू

पंतप्रधान जस्टीन ट्र्यूडेयू यांची पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. काल(गुरुवार) हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत उघड झाले आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Mar 13, 2020, 8:09 AM IST

ओटावा- जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहेत. आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. अनेक देशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबत उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतेच कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान जस्टीन ट्र्यूडेयू यांची पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. काल(गुरुवार) हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्स आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इराणमध्ये अनेक राजकारणी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे.

देशभरामध्ये कोरोना विषाणूमुळे ४ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध लागू केले आहेत. भारतामध्ये आत्तापर्यंत ७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details