लॉस एंजेलिस - कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये आग पसरतच आहे. या वणव्यात जंगलांमधील प्राण्यांचे बळी जात आहेत. कॅलिफोर्नियामधील अग्निशमन दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर वन्य आगीचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तापमानच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.
कॅलिफोर्नियामधील जंगलात आग; शेकडो एकर परिसरातील जैवविविधता खाक - California
कॅलिफोर्नियामधील जंगलांमध्ये आग पसरतच आहे. कॅलिफोर्नियामधील अग्निशमन दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर वन्य आगीचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
लॉस एंजेलिसमधील उत्तरेकडी व्हॅलीमध्ये आग लागली आहे. ही आग शेकडो एकर परिसरात पसरली आहे. शनिवारी सकाळपर्यंत या आगीमध्ये फक्त 12 टक्के घट झाली. या आगीच्या सपाट्यात 23 चौरस मैल (59.5 चौरस किलोमीटर) पेक्षा जास्त क्षेत्रातील झाडे गेली. आग लागलेल्या परिसरातील लोकांना घरे खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आग लावणाऱ्या एका संशयित व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. उस्मीन पालेन्सिया (वय 36) अशी त्याची ओळख पटली आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या जागेजवळील नदीकाठच्या छावणीत तो राहत होता, असे आझुसा पोलिसांनी सांगितले.