वॉशिंग्टन :अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे. मॉडर्नाची लस दिल्यानंतर कित्येक लोकांना मोठ्या प्रमाणात अॅलर्जी जाणवू लागली होती. त्यामुळे, सध्या हे लसीकरण थांबवण्यात आल्याची माहिती कॅलिफोर्निया राज्याच्या रोगशास्त्रज्ञ डॉ. एरिका पॅन यांनी दिली आहे.
दहा जणांना ठेवावे लागले निरीक्षणाखाली..
"मॉडर्ना लसीच्या एका विशिष्ट लॉटमधून लस दिलेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅलर्जिक रिअॅक्शन दिसून आली. यांपैकी सुमारे दहा जणांना २४ तासांपर्यंत निरीक्षणाखाली ठेवावे लागले होते, असे पॅन यांनी स्पष्ट केले. राज्यातील एकूण २८७ आरोग्यकेंद्रांमध्ये या लॉटमधील सुमारे ३ लाख ३० हजार डोस पाठवण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.