महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण.. - ब्राझिल पंतप्रधान कोरोना

पत्रकारांशी बोलत त्यांनी याबाबत माहिती दिली. देशाची राजधानी ब्राझिलियामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मास्कही लावला होता. "मी सुदृढ दिसतो आहे. मी इतका सशक्त आहे, की इथे चालत एक फेरीही मारू शकतो. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मी तसे करणार नाही." असे बोल्सोनारो म्हणाले...

Brazil's President tests +ve for coronavirus
ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो कोरोनाची लागण..

By

Published : Jul 7, 2020, 10:18 PM IST

ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण..

ब्राझिलिया :ब्राझीलचे पंतप्रधान जैर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधानांनी स्वतःच याबाबत माहिती दिली.

पत्रकारांशी बोलत त्यांनी याबाबत माहिती दिली. देशाची राजधानी ब्राझिलियामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मास्कही लावला होता.

"मी सुदृढ दिसतो आहे. मी इतका सशक्त आहे, की इथे चालत एक फेरीही मारू शकतो. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मी तसे करणार नाही." असे बोल्सोनारो म्हणाले.

यापूर्वी अनेक वेळा पंतप्रधानांनी मोठमोठ्या लोकांशी हस्तांदोलन केले आहे. बऱ्याच वेळा त्यांनी लोकांना भेटताना मास्कही घातला नसल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले, की पूर्वी एक खेळाडू राहिलो असल्यामुळे माझ्या सुदृढ शरीराला या विषाणूमुळे फारसा धोका नाही. माझ्यासाठी हा केवळ एक साधा फ्लू असणार आहे.

हेही वाचा :अमेरिकेत 'मास्क घालणे' बनला राजकीय प्रश्न..

ABOUT THE AUTHOR

...view details