महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ट्रम्प यांच्यानंतर ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी मानले मोदींचे आभार - हाड्रोक्लोरोक्वीन औषध

पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. आपल्याला एचसीक्यू या गोळ्यांसाठी लागणार कच्चा माल भारत पुरवणार आहे. त्यामुळे आपल्याकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी गोळ्यांचे उत्पादन सुरू राहील - जैर बोलसोनारो

जैर बोलसोनारो
जैर बोलसोनारो

By

Published : Apr 9, 2020, 4:58 PM IST

नवी दिल्ली - हाड्रोक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करण्यास भारताने परवानगी दिल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांनी मोदींचे आभार मानले आहेत. एचसीक्यू गोळ्यांसाठी लागणारा कच्चा माल ब्राझिलला निर्णयात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. बोलसोनारो यांनी पत्र लिहून भारताकडे या गोळ्यांची मागणी केली होती.

पंतप्रधान मोदींशी चर्चा केल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. आपल्याला एचसीक्यू या गोळ्यांसाठी लागणार कच्चा माल भारत पुरवणार आहे. त्यामुळे आपल्याकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी गोळ्यांचे उत्पादन सुरू राहील. ब्राझिलच्या जनतेला योग्य वेळी मदत केल्याबद्दल भारताचे आम्ही आभार मानतो, असे बोलसेनारो म्हणाले.

दक्षिण अमेरिका खंडात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त ब्राझिल देशामध्ये आहेत. येथे 14 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून सातशे जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी आणि बोलसोनारो यांचे याआधीही फोनवर बोलणे झाले आहे. त्यावेळी त्यांनी एचसीक्यू गोळ्यांची मागणी भारताकडे केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोळ्यांच्या पुरवठा केल्याबद्दल मोदींचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details