महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोनावरील लसीसह उपचार शोधण्याकरता अब्जावधी डॉलरचा खर्च - cost for COVID19 therapeutics project

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची लस शोधण्याच्या मोहिमेला गती देण्याचे शुक्रवारी आवाहन केले. कितीही किंमत असली तरी कोरोनाची लस आणि उपचार हे जगाच्या कानाकोपऱ्यातील गरजूंना मिळायला हवे, अशी आरोग्य संघटनेने भूमिका मांडली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jun 27, 2020, 2:06 PM IST

जीनिव्हा- जगभरात कोरोनाची लस आणि उपचार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठे बजेट लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, जर ही गुंतवणूक केली नाही तर कोरोनाशी लढण्याकरता व त्यानंतर अपयश आल्यास होण्यासाठी त्याहून मोठा खर्च होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची लस शोधण्याच्या मोहिमेला गती देण्याचे शुक्रवारी आवाहन केले. कितीही किंमत असली तरी कोरोनाची लस आणि उपचार हे जगाच्या कानाकोपऱ्यातील गरजूंना मिळायला हवे, अशी आरोग्य संघटनेने भूमिका मांडली आहे.

युरोपियन युनियन परिषदेपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (हू) निधी आणि मदत मिळण्याची आशा व्यक्त केली. लस शोधण्याच्या मोहिमेला अमेरिकेने निधी देण्यास नकार दिला आहे.

हू आणि त्यांच्या भागीदारांना कोरोनावरील प्रकल्पासाठी 2021 पर्यंत 31 अब्ज डॉलर लागणार आहेत. हा निधी कोरोनावर लसीच्या संशोधन-निर्मिती, उपचार, थेरपी व डायग्नोस्टिकसाठी वापरण्यात येणार आहे. जगभरात कोरोनाची 9.6 दशलक्षहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 लाख 90 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाच्या लसीसाठीचा खर्च स्पष्ट आहे. महामारी लवकरात लवकर संपणे आवश्यक आहे. आपण जर एकत्रित आलो नाही, तर मानवी आणि आर्थिक किंमत मोठी चुकवावी लागणा असल्याचे डॉ. न्गोझो ओकोन्जो आयवेला यांनी सांगितले. ते हूच्या अध्यक्षांचे विशेष प्रतिनिधी आहेत. आकडे खूप मोठे वाटत असले तरी त्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details