वॉशिंग्टन डी. सी - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यातच आगामी चार ते सहा महिने अत्यंत वाईट असतील, असे मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. तथापि, त्यांच्या संस्थने कोरोना लस विकसीत करण्यासाठीच्या प्रयत्नात सहभाग घेतला आहे.
आगामी काळामध्ये जर आपण कोरोना नियमांचे पालन केले. तरच मृत्यूची संख्या थोडी कमी होईल. अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची सर्वाधिक आहे. येत्या काळात उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी अमेरिका चांगले काम करेल, असेही ते म्हणाले. यापूर्वी 2015 मध्ये जेव्ही मी महामारी उद्भवू शकते, असे सांगितले होते. तेव्हा मृतांची संख्येवर बोललो होते. हा विषाणू घातक असून जीवघेणा आहे. अद्यापही आपण वाईट काळ पाहिला नाही, असेही ते म्हणाले.
2021 चा उन्हाळा जवळजवळ सामान्य -
यापूर्वी बिल गेट्स यांनी 2021 चा उन्हाळा जवळजवळ सामान्य असेल, असे वक्तव्य केलं होतं. लस मंजूर होऊन लवकर उपलब्ध झाल्यास उन्हाळ्यापर्यंत बहुधा बर्याच गोष्टी सामान्य होतील. संपूर्ण देशातील सर्व शहरांमधील जनजीवन पूर्वपदावर येईल, असा विश्वास गेट्स यांनी सीएनएनशी बोलताना व्यक्त केला होता. तथापि, अमेरिकेतील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. या रुग्णांची आणि मृतांची संख्या दररोज यातील 'वाईट विक्रम' उभे करत आहे. येथील बाधितांचे आणि मृतांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
मोदींची बिल गेट्स यांच्याशी चर्चा -
अमेरिकेनंतर कोरोनाचा सर्वांत जास्त प्रसार भारतामध्ये झाला आहे. भारतामधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोनाचे आव्हान आणि या भयानक साथीला सामोरे जाण्यासाठीच्या उपायांवर दोघांनी चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूच्या साथीवर लढण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांचीही गेट्स यांना माहिती दिली होती.
हेही वाचा -चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो धडकली झाडाला; पाच जणांचा मृत्यू