वॉशिंग्टन डी. सी -वडिलांना सायकलवर मागच्या सीटवर बसवत १५ वर्षीय ज्योती कुमारीने गुरुग्राम ते बिहार हे १२०० किलोमीटरचे अंतर अवघ्या ७ दिवसांत पूर्ण केल्याचे समोर आले. तिच्या या संघर्षाची चर्चा सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ज्योती कुमारीच्या कामगिरीची दखल घेतली आहे.
'सहनशक्ती आणि प्रेमाच्या या पराक्रमाने भारतीय लोकांचे आणि सायकल फेडरेशनचे लक्ष वेधून घेतले', असे टि्वट इवांका ट्रम्प यांनी केले आहे.
ती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर भारतीय सायकलिंग महासंघाने (सीएफआय) ज्योतीला चाचणीसाठी बोलावण धाडलं आहे. जर ज्योतीने हे ट्रायल यशस्वी पूर्ण केले तर तिची नॅशनल सायकलिंग अकॅडमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी म्हणून निवड होऊ शकते, असे भारतीय सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी सांगितलं
सद्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मजूर मिळेल त्या मार्गाने आपले गाव गाठण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशाच धाडसी प्रयत्न करणाऱ्या ज्योती कुमारीच्या संघर्षाची कहाणी समोर आली. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाल्यामुळे त्यांचा रोजगार तुटला. यानंतर ज्योतीने सायकलवर आपल्या वडिलांना पाठीमागे बसवत बिहार गाठण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवत गुरुग्राम ते बिहार हे १२०० किलोमीटरचे अंतर अवघ्या ७ दिवसात पूर्ण केले. तिच्या या संघर्षाची चर्चा सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये झाली.