वॉशिंग्टन : जगभरातील एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर) समुदायाच्या हक्कांसाठी जो बायडेन यांनी पुढाकार घेतला आहे. ते यासाठी एक अध्यक्षीय मेमो जारी करणार आहेत, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सल्लिव्हन यांनी गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) दिली.
आज होणाऱ्या स्टेट डिपार्टमेंटच्या भाषणामध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन या मेमोची घोषणा करतील, असेही जॅक यांनी स्पष्ट केले. या हक्कांसाठी अमेरिका केवळ बोलत नाही, तर त्यादृष्टीने कार्यही करते हे यामधून दिसून येते. तसेच केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जगभरातील एलजीबीटीक्यू समुदायाच्या हक्कांच्या रक्षणासाठी अमेरिका तत्पर असल्याचेही यातून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.