महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'सत्तेत आल्यास सर्वांना कोरोना लस मोफत देणार' - डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन

रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. मी निवडून आल्यास सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोना लस मोफत देईल, असे जो बायडेन यांनी आश्वासन दिले आहे.

बायडेन
बायडेन

By

Published : Oct 24, 2020, 3:52 PM IST

वॉशिंग्टन डी.सी - जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार झाला असून याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. यातच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. मी निवडून आल्यास सर्व अमेरिकन नागरिकांना कोरोना लस मोफत देईल, असे जो बायडेन यांनी आश्वासन दिले आहे.

एकदा का आपल्याला सुरक्षीत आणि प्रभावी कोरोना लस मिळाली, की ती सर्वांपर्यंत पोहचवली जाईल. गेल्या आठ महिन्यांपूर्वी अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झाला होता. मात्र, अजूनही ट्रम्प यांच्याकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही योजना नाहीत. अमेरिकेतील प्रत्येक राज्यात कोरोना प्रसार झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 2 लाख 23 हजार लोकांचा बळी गेला आहे, असे बायडेन म्हणाले.

कोरोनाचा अमेरिकेला फटका -

सध्या, कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत कोरोनामुळे अमेरिकेत 84 लाख 84 हजार 991 जणांना लागण झाली आहे. तर 2 लाख 23 हजार 914 बळी गेला आहे. तर अमरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढील महिन्यात ३ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details