वॉशिंग्टन - अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पोल्स सर्वेक्षणात दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे असल्याचे समोर आले आहे. 29 सप्टेंबरला या दोन प्रतिस्पर्ध्यांदरम्यान झालेल्या वादविवाद-चर्चेनंतर फ्लोरिडा आणि पेनसिल्व्हानिया या दोन राज्यांत त्यांच्या निवडणुकीतील भवितव्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जो बिडेन यांना अधिक पसंती मिळाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा -'आगामी काळ खऱ्या परीक्षेचा...'; डोनाल्ड ट्रम्प यांचे टि्वट
शनिवारी प्रसिद्ध झालेल्या न्यूयॉर्क टाइम्स-सिएना महाविद्यालयाच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. पेडसिल्व्हेनिया येथे बिडेन हे 7 टक्के गुणांनी ट्रम्प यांच्या पुढे होते. त्यांना ट्रम्प यांच्या 42 टक्क्यांच्या तुलनेत 49 टक्के गुण मिळाले. तर, फ्लोरिडामध्ये माजी उपराष्ट्रपती बिडेन थोड्याशा फरकाने ट्रम्प यांच्या पुढे होते. येथे ट्रम्प यांना 42 टक्के गुण मिळाले तर, बिडेन यांना 47 टक्क्यांपर्यंत मिळाले.
2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांना या दोन राज्यांमध्ये थोड्याशा फरकाने विजय मिळाला होता. फ्लोरिडा, अॅरिझोना, जॉर्जिया, आयोवा, मेन, मिशिगन, मिनेसोटा, नेवाडा, न्यू हॅम्पशायर, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वेनिया आणि विस्कॉन्सिन ही दोलायमान स्थितीत असलेली राज्ये (स्विंग स्टेट्स) आहेत. येथे होणाऱ्या मतदानाचा निवडणुकीवर मोठा परिणाम होईल, असे मानले जात आहे.
हेही वाचा -ऑनलाइन फसवणुकीविरोधात यूके आणि भारतीय सुरक्षा दलांचे संयुक्त 'ऑपरेशन'