वॉशिंग्टन -अमरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढील महिन्यात ३ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. डेमोक्रटिक आणि रिपब्लिक पक्ष जोरदार प्रचार करत असून त्यासाठी मोठा निधी लागत आहे. ट्रम्प यांच्या तुलनेत आत्तापर्यंत जो बायडेन यांनी सुमारे १७ कोटी डॉलर जास्त निधी जमा केला आहे. याचा फायदा बायडेन यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या निवडणूक आयोगाकडील ही माहिती समोर आली आहे.
निवडणुकीसाठी निधी जमा करण्यात जो बायडेन अव्वल, ट्रम्प पिछाडीवर - जो बायडेन निवडणूक निधी बातमी
ट्रम्प यांच्या तुलनेत आत्तापर्यंत जो बायडेन यांनी सुमारे १७ कोटी डॉलर जास्त निवडणूक निधी जमा केला आहे. याचा फायदा बायडेन यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
सप्टेंबर महिन्यापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी तब्बल ३८ कोटी डॉलर निधी जमा केला होता. तर त्या तुलनेत ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाकडे फक्त २४ कोटी डॉलर निधी जमा झाला आहे. २०१६च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या त्यावेळच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी सुमारे १५ कोटी डॉलर निधी जमा केला होता. त्यातुलनेत बायडेन यांची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसत आहे. कमी निधी जमा झाला असला तरी ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी पुरेसा निधी असल्याचे रिपब्लिक पक्षाचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांनी येत्या काही दिवसांमध्ये मस्केगॉन, मिशिगन, जेनेसविले, विस्कॉन्सिन या राज्यांमध्ये प्रचाराचे नियोजन केले आहे. त्यावरून ट्रम्प यांच्यावर डेमोक्रॅटिक पक्षाने हल्लाबोल केला आहे. देशात कोरोनाची साथ वाढली आहे. कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू होत असताना ट्रम्प मात्र आपल्या प्रचारात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी मागील निवडणूक विजयात महत्त्वाची भूमिका असलेल्या अप्पर मिडवेस्ट भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी रुग्णालयातून एक व्हिडीओ ट्विट केला होता, त्यात त्यांनी म्हटले होते की, अमेरिकेला आणखी बलशाली बनवायचे आहे. त्यासाठी मला पुन्हा निवडून येण्याची आवश्यकता आहे.