महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 1, 2020, 7:49 PM IST

ETV Bharat / international

बायडेन-हॅरिस यांनी गुरुपर्वानिमित्त जगभरातील शीखांना दिल्या शुभेच्छा

'या दिवशी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, गुरु नानकांचा दयाळूपणा आणि ऐक्य या संदेशामुळे आपल्याला व्यक्ती आणि एक राष्ट्र म्हणून पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते. आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत गुरु नानक यांचे शिक्षण, मानवतेची सेवा आणि नैतिक अखंडता शाश्वत आहे. अमेरिकेत आणि जगभरातील या आव्हानात्मक वर्षात शिखांनी हे प्रतिबिंबित केले आहे,' असे बायडेन आणि हॅरिस यांनी म्हटले आहे.

बायडेन हॅरिस लेटेस्ट न्यूज
बायडेन हॅरिस लेटेस्ट न्यूज

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले जो बायडेन आणि उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी गुरुपर्वानिमित्त शीखांना प्रथम शीख गुरु गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

सोमवारी दिलेल्या संयुक्त निवेदनात ते म्हणाले, 'या दिवशी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, गुरु नानकांचा दयाळूपणा आणि ऐक्य या संदेशामुळे आपल्याला व्यक्ती आणि एक राष्ट्र म्हणून पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते. आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत गुरु नानक यांचे शिक्षण, मानवतेची सेवा आणि नैतिक अखंडता शाश्वत आहे. अमेरिकेत आणि जगभरातील या आव्हानात्मक वर्षात शिखांनी हे प्रतिबिंबित केले आहे.'

हेही वाचा -लंडन : लॉकडाऊनविरोधात आंदोलन करणाऱ्या 150 हून अधिक लोकांना अटक

'ज्या शिखांनी साथीच्या काळात सातत्याने सकारात्मक कार्य केले आणि असंख्य लोकांना जेवण तयार करण्यासाठी, सेवा देण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी त्यांचे गुरुद्वाराच्या सामुदायिक लंगर सर्वांसाठी खुले केले. लोकांना याची सर्वात जास्त गरज होती,'असे म्हणत बायडेन आणि हॅरिस यांनी सर्व शीख-अमेरिकन लोकांचे आभार मानले. 'वांशिक निषेधाच्या वेळी आपण सर्व वयोगटातील शीखांना शांततेत मोर्चा काढताना पाहिले आहे,' असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा -अमेरिकच्या अध्यक्षपदाचा वाद सुटेना; ट्विटरने 'हा' घेतला निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details