वॉशिंग्टन -अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार दोन्ही पक्षांकडून जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो. बायडेन यांनी आपल्या प्रचारासाठी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांच्या जाहिरातींवर विक्रमी पैसा खर्च केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आतापर्यंत एवढा पैसा कोणत्याही व्यक्तीने खर्च केला नव्हता, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडेन यांचा जाहिरातींवर 2 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक खर्च!
अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार दोन्ही पक्षांकडून जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो. बायडेन रिंगणात असून त्यांनी आपल्या प्रचारासाठी टीव्ही आणि डिजिटल माध्यमांच्या जाहिरातींवर विक्रमी पैसा खर्च केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल 2 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक खर्च केला आहे.
जो. बायडेन यांनी प्रचारासाठी टीव्ही आणि डिजिटल मीडियावरील जाहिरातींच्या माध्यमातून तब्बल 2 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रसार माध्यमांसाठी आणखी 57 दशलक्ष डॉलरचा निधी त्यांनी राखून ठेवला असल्याची देखील चर्चा आहे. विद्यामान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार मोहिमेवर गेल्या दोन वर्षांत 342 दशलक्ष डॉलर्स खर्च केले असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आपण राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास अमेरिकेतल्या प्रत्येक कोरोना रुग्णाला कोरोनाची लस मोफत देऊ, अशी घोषणा जो. बायडेन यांनी केली आहे.