लिमा : पेरु देशामध्ये कोरोनाची लागण झालेल्या दोन महिलांनी निरोगी बाळांना जन्म दिला आहे. या बाळांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना या विषाणूची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
एडगार्डो रेबाग्लियाटी मार्टिन्स नॅशनल रुग्णालयातील दोन महिलांची मार्च महिन्याच्या अखेरीस प्रसूती झाली होती. या दोन्ही महिलांची प्रसूती सीझरियन पद्धतीने करण्यात आली. यातील पहिल्या बाळाचा जन्म २७ मार्चला प्रसूतीच्या ३२ व्या आठवड्यात झाला होता. या बाळाचे वजन १ किलो ७७ ग्रॅम होते. तर, दुसऱ्या बाळाचा जन्म ३१ मार्चला प्रसूतीच्या ३८व्या आठवड्यात झाली होती. या बाळाचे वजन ३ किलो ३०० ग्रॅम होते.