वॉशिग्टंन डी. सी - जॉर्ज फ्लॉईड प्रकरणामुळे अमेरिका धुमसत आहे. जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा मिनियापोलिसमधील लोकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित झाला आहे. अमेरिकेत पोलिसाच्या आणि देशातील एकूणच वर्णभेदाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, आणि एका मोठ्या आंदोलनाला सुरूवात झाली
'मला श्वास घेता येत नाही'! अमेरिकेतील वर्णद्वेषविरोधी आंदोलन तीव्र - Derek Chauvin
जॉर्ज फ्लॉईड प्रकरणामुळे अमेरिका धुमसत आहे. अमेरिकेत पोलिसाच्या आणि देशातील एकूणच वर्णभेदाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले, आणि एका मोठ्या आंदोलनाला सुरूवात झाली. अमेरिकेत "मला श्वास घेता येत नाही" या घोषवाक्याने आंदोलन तीव्र झाले आहे.
जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा माईनपोलीस याठिकाणी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत मोर्चे सुरू झाले आहेत. जॉर्जला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करीत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत "मला श्वास घेता येत नाही" या घोषवाक्याने आंदोलन सुरू आहे.
जॉर्ज फ्लॉईड घटनेशी संबंधित असलेला अधिकारी डेरेक शॉविन याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात कृष्णवर्णीय लोकांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढल्याची भावना अमेरिकेत रुजत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही अमेरिकेतील वातावरण आंदोलकांनी ढवळून काढले आहे.