वॉशिंग्टन - बीजिंगने हाँगकाँगवर वादग्रस्त राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. यामुळे अमेरिकेने त्यावर निर्बंध लादले आहे. यानुसार, कोणतीही अमेरिकन व्यक्ती शहर व देशातील चीनच्या निर्बंध घालण्यात आलेल्या अधिकाऱ्यांशी व्यवहार करू शकत नाही, अशी घोषणा अमेरिकेच्या कोषागार विभागाने केली आहे, असे वृत्त रविवारी देण्यात आले.
दक्षिण चायना मॉर्निंग पोस्ट (एससीएमपी) वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील परकीय मालमत्ता विभागाच्या कार्यालयाने शहरातील मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लॅम आणि अन्य दहा स्थानिक आणि मुख्य भूप्रदेशातील अधिकाऱ्यांमार्फत गेल्या महिन्यात हे निर्बंध लादले होते.
या कारवाईमुळे संबंधित व्यक्तींच्या अमेरिकेतील मालमत्तांना अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय, त्यांचे अमेरिकन नागरिक आणि व्यवसाय यांच्याशी सर्वसाधारण व्यवहार थांबवण्यात आले आहेत.
हेही वाचा -एनसीबीने जप्त केले दीपिका-रकुलचे मोबाईल; नवी नावे समोर येण्याची शक्यता