महाराष्ट्र

maharashtra

कोरोनावरील संशोधनासाठी अमेरिकन लंग असोसिएशन घेणार नागरिकांची मदत

By

Published : Apr 25, 2020, 11:48 AM IST

अमेरिकन लंग असोसिएशनच्या या उपक्रमात 18 वर्षांवरील व्यक्ती सहभागी होऊ शकतो. नागरिकांना यासाठी एक अ‌ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. हे अ‌ॅप सुरक्षित आणि मोफत आहे. अ‌ॅपद्वारे नागरिकांनी जमा केलेल्या माहितीचा शास्त्रज्ञाना कोरोनावरील संशोधन करताना फायदा होणार आहे.

american-lung-association-enrolls-citizen-scientists-for-mobile-based-covid-19-study
कोरोनावरील संशोधनासाठी अमेरिकन लंग असोसिएशन घेणार नागरिकांची मदत

हैदराबाद- संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला असून लाखो लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनावरील उपचार पद्धती आणि औषध शोधण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करत आहेत. अमेरिकन लंग असोसिएशन या संस्थेने नॉर्थवेस्ट विद्यापीठ, कॅलिफोर्निया-सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठ यांच्यासह कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनावरील अभ्यासासाठी ते नागरिकांची मदत घेणार आहेत. यामध्ये नागरिक मोबाईल फोनमधील अ‌ॅपद्वारे माहिती पुरवतील.

अमेरिकन लंग असोसिएशनच्या या उपक्रमात 18 वर्षांवरील व्यक्ती सहभागी होऊ शकतो. नागरिकांना यासाठी एक अ‌ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे आवश्यक आहे. हे अ‌ॅप सुरक्षित आणि मोफत आहे. अ‌ॅप डाऊनलोड करणाऱ्यांना नागरिक शास्त्रज्ञ संबोधले जाणार आहे. अ‌ॅपद्वारे नागरिकांनी जमा केलेल्या माहितीचा शास्त्रज्ञाना कोरोनावरील संशोधन करताना फायदा होणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार वैयक्तिक पातळीवर आणि प्रादेशिक पातळीवर कसा होतो, यामध्ये कोणते घटक व्यक्तीला संसर्ग होण्यास कारणीभूत ठरतात याचा अभ्यास सर्वांगीण करण्यासाठी या अ‌ॅपचा वापर होईल.

नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर माहिती जमा झाल्यानंतर शास्त्रज्ञांना त्या माहितीचे परिक्षण,अभ्यास केल्यानंतर त्यानंतर कोरोना विषाणू कसा पसरतो, कसा संक्रमित होतो याचा अभ्यास करता येईल आणि नव्याने होणारे विषाणूचे संक्रमण रोखता येईल.

अमेरिकन लंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ हरोल्ड विम्मर यांनी कोविड-19 नागरिक विज्ञान अभ्यासात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतील, असे म्हटले आहे. या अभ्यासात आमची संस्था मोठ्या प्रमाणावर योग्य प्रकारे संशोधन करेल. आम्हाला या अभ्यासात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभाग नोंदवतील अशी आशा आहे, नगारिकांकडून जमा होणारी माहिती आमच्यासाठी महत्वाची आहे. या माहितीचा फायदा आम्हाला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीत होईल, असे विम्मर यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details