वॉशिंग्टन -अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि निवारण केंद्राने (सीडीसी) कोरोना विषाणूवरील संभाव्य लस एक नोव्हेंबरपासून वितरणासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. अशी सूचना राज्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, बुधवारी सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी सर्व राज्यांच्या राज्यपाल आणि आरोग्य विभागांना पत्र लिहून 'मॅककेसन कॉपोर्रेशन आणि त्यांच्या सहायक कंपन्यांना वितरण स्थळे सुरू करण्यासाठी परमिट मिळवण्यासाठी अर्ज मागवत आहे,' असे कळवले आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यात काही अडचणी असल्यास त्यांनी त्या सोडवण्यास राज्यपालांनी मदत करावी, असे पत्रात म्हटले आहे.