महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आ़कडा 2 लाखांच्या पुढे; 5 हजार मृत्यू - अमेरिका कोरोना मृत्यू

200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाच प्रसार झाला असून अमेरिकेत सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. न्यूयॉर्क शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वात जास्त आहे.

corona file pic
कोरोना प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Apr 2, 2020, 9:16 PM IST

वॉशिंग्टन डी. सी- अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 15 हजार 362 झाला आहे. तर 5 हजार 113 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 359 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 2 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले असले तरी फक्त 8 हजार 878 जण पूर्णत: बरे झाले आहेत.

200 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाच प्रसार झाला असून अमेरिकेत सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. न्यूयॉर्क शहरात सुमारे 84 हजार रुग्ण आढळून आले असून न्यूजर्सी प्रांतात 22 हजार कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. कॅलिफोर्निया आणि मिशिगन प्रांतातही 9 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी तेथे संचारबंदी लागू करण्यात आली नाही. त्याएवजी अमेरिकेत प्रवासावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनामुळे जागतिक स्तरावर भीती पसरली आहे. अनेक देशांनी संचारबंदी लागू केली असून व्यापार, पर्यटन, व्यवसाय, बाजारहाट आणि जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. महामंदी येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details