ओटावा - कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टीन टुड्रो पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर विराजमान होतील, असा अंदाज बहुतांशी एक्झिट पोलने वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरला तर जस्टीन दुसऱ्यांदा कॅनडाचे पंतप्रधान होतील.
जस्टीन टुड्रो पुन्हा एकदा होणार कॅनडाचे पंतप्रधान! - कॅनडा सार्वत्रिक निवडणूक २०१९
३३८ जागांसाठी कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टीन टुड्रो पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर विराजमान होतील, असा अंदाज बहुतांशी एक्झिट पोलने वर्तवला आहे.

सोमवारी कॅनडीयन जनतेने मतदान करत उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. ३३८ जागांसाठी कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये २७.४ दशलक्ष मतदारांनी मतदान केले. न्युफाउंडलंड आणि लँब्रोडर प्रांतातून लिबरल्स पार्टी आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते अँड्र्यू शीर यांनी जस्टीन ट्रुडोंसमोर चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. सुरूवातीच्या काळात जस्टीन टुड्रो कॅनडीयन जनतेच्या मनात जागा मिळवली होती. मात्र, काही वादग्रस्त मुद्दयांवरून टुड्रोंची प्रतिमा डागाळली होती.