महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

महाभियोग याचा अर्थ दोषी ठरणे किंवा राजीनामा नव्हे... - Donald Trump

माजी रिअलिटी टीव्ही स्टार आणि बांधकाम क्षेत्रातील अब्जाधीश सम्राटाचे राजकीय नेते झालेले ट्रम्प हे महाभियोगाला सामोरे जाणारे अमेरिकेच्या इतिहासातील ४५ अध्यक्षांपैकी चौथे अध्यक्ष असतील.

महाभियोग
महाभियोग

By

Published : Dec 8, 2019, 1:46 PM IST

अमेरिकन प्रतिनिधीसभेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी गुरूवारी जाहीर केले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाईल. मूलतः, प्रस्तावित कालमर्यादेचे विशिष्ट तपशील न देता त्यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाला हिरवा कंदिल दिला.


माजी रिअलिटी टीव्ही स्टार आणि बांधकाम क्षेत्रातील अब्जाधीश सम्राटाचे राजकीय नेते झालेले ट्रम्प हे महाभियोगाला सामोरे जाणारे अमेरिकेच्या इतिहासातील ४५ अध्यक्षांपैकी चौथे अध्यक्ष असतील.


ट्रम्प यांच्या विरोधातील आरोप अमेरिकन काँग्रेसमधील निनावी जागल्याने ट्रम्प यांनी आपल्या शक्तीशाली अध्यक्षपदाचा वापर करून आपले राजकीय प्रतिस्पर्धी-माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांचे पुत्र हंटर यांच्याविरोधात चौकशी करण्यासाठी युक्रेनच्या अध्यक्षांवर जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ट्रम्प यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सुरू झाली.


या तक्रारीनुसार ट्रम्प यांनी ४०० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या लष्करी मदतीचे गाजर दाखवून अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये भेटीला बोलवले आणि आपले डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्षीय निवडणुकीतील प्रतिस्पर्धी जो बिडेन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात चौकशी करण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली, असे म्हटले आहे.


बिडेन हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या मुलाने हंटरने युक्रेनियन उर्जा कंपनीत नोकरी केली होती आणि याप्रकरणी ट्रम्प यांनी हितसंबंधांचा संघर्ष प्रकरणी चौकशीची मागणी केली होती, असे वृत्तआहे.


दुसरे म्हणजे या वृत्तांनुसार, २०१६ मधील अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशिया नव्हे तर युक्रेनने कथित डेमोक्रेटिक पक्षाचे ईमेल हॅक करून हस्तक्षेप केला होता, याचा ट्रम्प यांना पुरावा हवा होता. मात्र ट्रम्प यांच्या या कट रचल्याच्या कथेला अमेरिकन गुप्तचर संस्थांनी स्वीकारलेले नाही, ज्यांनी रशियाला लोकशाही प्रक्रियेत मुख्य खलनायक रंगवले आहे.


पुढे काय होणार?
खालच्या प्रतिनिधीसभेत डेमोक्रेटिक पक्षाचे नियंत्रण असून डेमोक्रेट सभासद आता हे लेख किंवा आरोप जे ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाचे आधार आहेत, ते वरिष्ठ सभागृहात सिनेटमध्ये पाठवण्याची अपेक्षा आहे.


एकदा ते झाले की, सिनेटला खटला चालवावा लागेल आणि अध्यक्षांना दोषी ठरवून पदावरून हटवण्यासाठी दोन तृतीयांशबहुमताची आवश्यकता लागेल. परंतु, रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमधील बहुमत आहे, हे लक्षात घेता, ट्रम्प यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता जवळपास नाहीच,परंतु हा संपूर्ण माग निवडणुकीच्या वर्षातील अत्यंत भयानक राजकीय युद्धात रूपांतरित होणार आहे.

जर अमेरिकन सिनेटमधील खटला झाला तर, अध्यक्षांना कोणत्याही इतर खटल्याप्रमाणेच त्यांच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील असतील. शेवटी, सिनेटला त्यांच्यावर महाभियोग मंजूर करावा का, यावर मतदान करावे लागेल.


रिपब्लिकन्सचे सिनेटमध्ये मोठे बहुमत असल्याने सर्वाधिक शक्यता असलेला परिणाम हाच आहे की, एक तर ट्रम्प दोषी आढळणार नाहीत किंवा प्रत्यक्षात त्यांच्यावर महाभियोग चालवलाच जाणार नाही. अखेरीस, ट्रम्प हेच सांगतील की, माझ्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झाले, माझ्यावर महाभियोग चालवलाच नाही, मी निरपराध आहे. हे भाकीत सहज करता येण्यासारखे आहे. रिपब्लिकन्स नेहमीच त्यांच्यामाग उभे राहिले आहेत आणि ट्रम्प यांनी त्यातील काहीही केले असले तरीही, त्यात काही गैर नाही, असे म्हणत आले आहेत, असे भाष्य कार्नेजी एन्डोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसचे उपाध्यक्ष जॉर्ज पेर्कोविच यांनी खास इटीव्ही भारतशी बोलताना केले आहे.

डेमोक्रेट्सचा महाभियोगापासून फायदा होईल का? आतापर्यंत अमेरिकेच्या इतिहासात अँड्र्यू जॉन्सन आणि बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग खटला चालवला गेला आहे, परंतु त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही. आणी क्लिंटन तर पुढील अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा निवडून येऊ शकले.


कुप्रसिद्ध वॉटरगेट प्रकरणात, ज्यात प्रतिस्पर्धी राजकीय डेमोक्रेटिक विरोधकांवर बेकायदेशीरपणे पाळत ठेवण्याचा समावेश होता, रिचर्ड निक्सन यांनी महाभियोग चालवण्याअगोदरच राजीनामा दिला. पण अगोदरची दोन प्रकरणे अगदी वेगळी होती. अँड्र्यू जॉन्सनचे प्रकरण १८७० मध्ये झाले.


अर्थात ते दुसर्यांदा निवडणुकीत उभेच राहिले नाहीत. दुसरे बिल क्लिंटन होते, ज्यांच्यावर महाभियोग चालला पण त्यांची फेरनिवड झाली. त्यामुळे तुम्ही त्यापासून कोणताही निष्कर्ष काढू शकता. आम्हाला जे माहीत आहे ते इतकेच की, अध्यक्षांना पाठिंब्याचा आधार आहे.


४० टक्के नागरिकांना ते काय करतात, हे माहीत नसले तरीही त्यांचा त्यांना पाठिंबा आहे. म्हणून यावर्षी आता निवडणूक होत आहे. महाभियोगातून जी माहिती येईल, ती निवडणुकीचा एक भाग असेल.


ट्रम्प त्यांना आवश्यक असलेली अतिरिक्त टक्केवारी मिळवू शकतील का, याचा अंदाज करणे अत्यंत अवघड आहे, असे पेर्कोविच पुढे म्हणतात. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार शोधताना त्यांच्या स्वतःच्या गोटात जितके चढउतार आले, ते पाहता, ट्रम्प यांच्या अध्यक्ष होण्याच्या शक्यतेवर परिणाम करण्यासाठी त्यांची प्रतिमा डेमोक्रेट्स या सर्व प्रक्रियेदरम्यान मलिन करतात का, हे सांगणे कठीण आहे.


डेमोक्रेटिक उमेदवारांमधून बाहेर पडलेल्या अगदी अलिकडच्या नेत्या म्हणजे कमला हॅरिस आहेत तर न्यूयॉर्कचे माजी महापौर आणि माध्यमसम्राट मायकेल ब्लूमबर्ग यांनी नुकताच प्रवेश केला आहे. पण महासत्तेच्या सर्वोच्च पदासाठी अत्यंत जोरदार राजकीय ध्रुवीकरणाची मोहीम राबवताना सार्या बंदुका डागल्या जाणार आहेत, हे तर निश्चित आहे.

२०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन्समध्ये फार पुढे नव्हते आणि अगदीच कुठेच नसताना ते अचानक समोर आले आणि जिंकलेही. म्हणून हे मैदान आकुंचित पावत आहे. पण सध्यातरी उपाध्यक्ष ज्यो बिडेन हे अजूनही महत्वपूर्ण आघाडी घेऊन आहेत. म्हणून त्यांना खाली यावे लागेल. आणि नंतर एकदोघांपैकी कोण वर येतो, याचे भाकीत करणे अवघड आहे.


मला माईक ब्लूमबर्ग आज जेथून सुरूवात करत आहेत, तेथून ते सर्वोच्च पदावर जातील, अशी शक्यता वाटत नाही. तरीही इतक्या घाईने अंदाज करणे अवघड आहे. निव़डणुका अजूनही एक वर्षांपेक्षा अधिक काळ पुढे आहेत, यावर पेर्कोविच अधोरेखित करतात.


लेखिका - स्मिता शर्मा, बंगळुरू

ABOUT THE AUTHOR

...view details