टक्स्टला गुटिएरेझ (मेक्सिको) -मेक्सिकोमध्ये एका ट्रकचा भीषण अपघात झाला ( Truck Crash South Mexico ) आहे. अमेरिकेतील मेस्किकोच्या चियापास राज्यातील मेस्किकन या शहरातील टक्स्टला गुटीएरेझजवळ हा अपघात झाला. या अपघातात 53 जणांचा मृत्यू झाला ( 53 migrants dead in truck crash ) आहे. तर तीन जण हे गंभीर जखमी आहेत. तर 21 जणांना गंभीर जखमा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
53 जणांच्या मृत्यूची, 54 जखमी -
एक मालवाहू ट्रक गुरुवारी दक्षिण मेक्सिकोमध्ये एका महामार्गावरील पादचारी पुलावर आदळल्यामुळे हा अपघात झाला. या ट्रकमध्ये शंभराहून अधिक लोक असल्याचे सांगितले जात आहे. मध्य अमेरिकेतून स्थलांतरित होत असलेले हे नागरिक असल्याची माहिती फेडरल अॅटर्नी जनरल कार्यालयाने दिली आहे. या अपघातातील 53 जणांच्या मृत्यूची यादी त्यांनी जाहिर केली आहे. तर 21 जणांना गंभीर जखमा असल्याचे त्यानी सांगितले.