धक्कादायक..! मेक्सिकोमध्ये विहिरीत आढळले ४४ मृतदेह - Mexico news
मॅक्सिकोमध्ये एका विहिरीत ४४ मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्वाडलजारा शहराच्या जवळच ही विहीर आहे. विहिरीजवळ दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मॅक्सिको सिटी- मॅक्सिकोमध्ये एका विहिरीत ४४ मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्वाडलजारा शहराच्या जवळच ही विहीर आहे. विहिरीजवळ दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला, त्याचे मृतदेह विहिरीत कोणी टाकले याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हे मृतदेह काळ्या पिशव्यांमध्ये घातले होते. मृतदेहांचे ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले आहे. यातील अनेक मृतदेहांचे तुकडे केले होते, त्यामुळे तुकडे एकत्र करून त्यांची ओळख पटवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोणी बेपत्ता असल्यास नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एखाद्या ठिकाणाहून मृतदेह सापडण्याची ही मेक्सिकोमधील वर्षातील दुसरी घटना आहे.