न्यूयॉर्क - मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमध्ये (Central African Republic - सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक) गुरुवारी अज्ञात बंदूकधार्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 3 अधिकारी ठार आणि दोन जखमी झाले, अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिव प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी एका निवेदनात दिली. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांनी मध्य अफ्रिकी राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलांवर झालेल्या या अज्ञात सशस्त्र हल्ल्याचा निषेध केला.
'सरचिटणीसांनी मृत शांती सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल, तसेच लोक आणि बुरुंडी सरकारबद्दल मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना लवकर आरोग्य मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -इथियोपियाची गृहयुद्धाच्या दिशेने वाटचाल.. देश अधोगतीच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता