वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील 3 जणांचा घरामागील स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती.
अमेरिका : स्विमिंग पूल दुर्घटनेत भारतीय वंशाच्या कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू - स्विमिंग पूल दुर्घटना
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील 3 जणांचा घरामागील स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
अमेरिका
भारत पटेल (62 वर्ष), त्यांची सून निशा पटेल 33 वर्ष) आणि 8 वर्षीय मुलगी अशी मृताची नावे आहेत. मुलीचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. पटेल कुटुंब काही आठवड्यांपूर्वी या घरातच रहायला आले होते, असे मृताचे शेजारी विशाल मकीन यांनी सांगितले.