वॉशिंग्टन - मूळचा पाकिस्तानी असलेल्या कॅनडीयन उद्योजक तहव्वूर राणा याला लॉस एन्जेलिस मध्ये अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून भारतीय गुप्तचर यंत्रणांना त्याचा शोध होता. तहव्वूर राणाचा सहभाग २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात होता. याबाबत भारत सरकारने त्याची कस्टडी मागितली आहे. याबाबत वकिलांनी अमेरिकन कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत राणाला कोणताही हवाई उड्डाणाचा धोका नसल्याचे सांगितले. तसेच त्याच्या सुटकेसाठी १.५ मिलियनचा बॉन्ड देऊ केला आहे.
मध्यवर्ती कॅलिफोर्नियातील अमेरिकेच्या जिल्हा न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी 30 जून रोजी राणाच्या बॉण्डची सुनावणी निश्चित केली आहे. सध्या भारत राणाची कस्टडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खुनाचा कट रचणे, बनावट कागदपत्रांचे लिलाव करणे, बनावट सह्यांमार्फत मालमत्तेसंदर्भात फसवणूक करणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये राणा संशयित आहे.