व्हर्जिनिया- अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात ११ जणांचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हर्जिनियातील म्युनसिपल सेंटरमध्ये हा प्रकार घडला.
अमेरिकेतल्या व्हर्जिनियात एकाचा अंदाधुंद गोळीबार; ११ जणांचा मत्यू - virginia
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्याने गोळ्या झाडल्या तो याच ठिकाणी काम करणारा कर्मचारी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारी व्यक्ती येथीलच कर्मचारी होती. त्याने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. यात तो मारला गेला आहे. मात्र, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या चकमकीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. आरोपीने गोळीबार करत ११ लोकांचा जीव का घेतला त्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्या व्यक्तीने गोळीबार केला त्याला आम्ही ठार केले आहे. त्याच्यासोबत इतर कोणीही या गोळीबारात सहभागी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अमेरिकेत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.