हरारे -जागतिक स्तरावर अन्नधान्याचे उत्पादन वाढत असताना झिंम्बाब्वे देशातील उपासमारीची विदारक स्थिती जगापुढे आली आहे. या देशातील निम्मी जनता तीव्र उपासमारीत जीवन जगत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या 'वर्ल्ड फूड प्रोग्राम'मधून समोर आली आहे.
हेही वाचा-पाकिस्तान तालिबानचा म्होरक्या अफगाणिस्तानमध्ये ठार
झिंम्बॉब्वेमध्ये पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे आणि आर्थिक संकटामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील ८० लाख नागरिकांना पुरेस अन्न मिळत नाही, तर ४० लाख जनता अन्नधान्याच्या मदतीवर अवलंबून आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते जेम्स बेलग्रेव्ह यांनी दिली आहे.
हेही वाचा-'चीन दडपशाहीतून स्वत:च्याच नागरिकांची ओळख आणि संस्कृती पुसून टाकतोय'
अनियमित आणि अल्प पाऊस, वाढणाऱ्या महागाईमुळे देशाची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. वर्षानुवर्षे पडणाऱ्या दुष्काळामुळे अन्नधान्यांचे उत्पादन रोडावले आहे. झिंम्बॉब्वे देशाला एकेकाळी आफ्रिकेचे 'ब्रेड बास्केट' म्हटले जायचे. मात्र, आता हाच देश अन्नधान्याच्या टंचाईत सापडला आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. देशातील तृणधान्याचे उत्पादन फक्त ५० टक्के जनतेची गरज भागवू शकते, असे डब्ल्युएफपीने म्हटले आहे.