काहिरा -इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेले 'द एव्हर गिव्हन' जहाज तब्बल सहा दिवसानंतर मोकळ करण्यात अखेर यश आले आहे. मंगळवारपासून या जहाजाला मोकळ करण्याचे प्रयत्न सुरु होते. सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 04.30 वाजता या जहाजाला मोकळ करण्यात आले आहे. या जहाजाची सुटका झाल्यानंतर अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला. याला कारणही तसेच आहे.
आशिया आणि युरोपमधील माल वाहून नेणारे पनामा ध्वजाचे 'द एव्हर गिव्हन' हे जहाज सुएझ कालव्यात मंगळवारी अडकले होते. त्यामुळे या मार्गातील जहाज वाहतूक अगदी ठप्प झाली होती. जागतिक व्यापारासाठी हा जलमार्ग खूप महत्त्वाचा आहे. जगभरातील व्यापाराच्या 12 टक्के मालाची सुवेझ कालव्यातून केली जाते. महामार्ग ठप्प झाल्याने जगभरातील अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. हे जहाज मोठे असल्याने सुवेझ कालवा बंद झाला होता. यामुळे खनिज तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या.
पनामा ध्वजाचे 'द एव्हर गिव्हन' जहाज फसल्यापासून त्यांची सुटका करण्यासाठी आणि जलमार्ग मोकळा करण्यासाठी अधिकारी काम करत होते. अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले. 'द एव्हर गिव्हन' जहाजाला 25 भारतीय चालवत होते. सर्व भारतीय चालक सुरक्षीत असल्याची माहिती आहे. भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा 193.3 किलोमीटर लांबीचा आहे. या जलमार्गाने तब्बल 30 शिपिंग कंटेनर जातात. जगातील 12 टक्के वस्तूची या कालव्यातून वाहतूक केली जाते
सुवेझ कालवा जगभरातील मालाची ने-आण करण्यासाठी फार महत्त्वाचा या कालव्यातून दररोज नऊ अब्ज डॉलर्सची उलाढाल होते. कोरोना साथीच्या आजाराने आधीच प्रभावित असलेल्या जागतिक वाहतुकीवर आणि व्यापारावर 'द एव्हर गिव्हन' जहाज अडकल्याने तीव्र परिणाम झाला आहे. तसेच कालव्यात जगभरातील 300 हून अधिक मालवाहू जहाज आणि तेल कंटेनर अडकले होते. सुवेझ कालवा पार करण्यासाठी ते वाट पहात होते.
सुवेझ कालवा इतका महत्त्वपूर्ण का?
सुवेझ कालवा जगभरातील मालाची ने-आण करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सुएझ कालवा हा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. त्याचे बांधकाम इ.स. 1869 साली पूर्ण करण्यात आले होते. सुएझ कालव्याचे उत्तरेकडील टोक बुर सैद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ स्थित आहे. सुएझ कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतुक शक्य झाली आहे. सुएझ कालवा सुरु होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे 7000 किमी लांबीचा वळसा घालुन जावे लागत असे.
सुवेझ कालवा जगभरातील मालाची ने-आण करण्यासाठी फार महत्त्वाचा पर्शियन (अरेबियन) आखाती देशांतील खनिज तेल क्षेत्राकडून यूरोपकडे खनिज तेल वाहून नेणाऱ्या तेलवाहू जहाजांची संख्या सर्वाधिक असते. त्याशिवाय या मार्गावरुन उत्तरेच्या दिशेने प्रामुख्याने कोळसा, कच्ची खनिज द्रव्ये, धातू, तेलबिया व इतर अवजड मालाची तर दक्षिणेकडे सिमेंट, खते, यंत्रसामग्री, तृणधान्ये व रिकामी तेलवाहू जहाजे यांची वाहतूक अधिक असते. कालव्यातून दररोज ५५ जहाजे वाहतूक करू शकतात (१९९८) मात्र अवजड व फार मोठ्या जहाजांना केप ऑफ गुड होप मार्ग अवलंबावा लागतो. या कालवामार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांना कर द्यावा लागत असल्याने वाहतूक महाग पडते.
'द एव्हर गिव्हन' सुएझ कालव्यात मंगळवारी अडकले