खार्टूम (सुदान) - सुदानच्या दारफुर येथे मालवाहू जेट विमान कोसळून ४ बालकांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. अल जेनिना विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. पश्चिम दारफूर राज्यातून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच विमान अपघातग्रस्त झाले, असे लष्करी प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
'विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच ते कोसळले. त्याचे अवशेष विमानतळापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर सापडले आहेत. या विमानातून अल जेनिना येथील अल-हेलाल अल-अहमाझ येथे वैद्यकीय साहित्य आणि औषधे आणण्यात येत होती. ती पोहोचवल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी विमान निघाले असताना ते कोसळले,' अशी माहिती मिळाली आहे.