खार्टूम - सुदानमधील सिरॅमिक कारखान्यात एलपीजी टँकरचा भीषण स्फोट झाला आहे. यात २३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १८ भारतीय लोकांचा समावेश आहेत. या दुर्घटनेत जवळपास १३० जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. १८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. मंगळवारी ही आग लागली होती. सालोमी सिरॅमिक फॅक्टरी असे या कारखान्याचे नाव आहे. बाहरी शहराजवळील कोबेर या परिसरात हा कारखाना आहे.
सुदानमध्ये कारखान्याला भीषण आग; 18 भारतीयांसह २३ जणांचा मृत्यू - 23 dead over 130 injured in factory blaze
सुदानमध्ये कारखान्याला लागलेल्या आगीत जण २३ ठार तर, १३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी ही आग लागली होती. सालोमी सिरॅमिक फॅक्टरी असे या कारखान्याचे नाव आहे.
कारखान्याला लागलेल्या आगीत २३ ठार
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतर येथील मंत्रिमंळाची बैठक होणार असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
Last Updated : Dec 4, 2019, 6:41 PM IST