वॉशिंग्टन - इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 6 अमेरिकन नागरिक ठार झाल्याच्या वृत्ताला पेंटॅगॉनने दुजोरा दिला आहे.
सिन्हुआ या वृत्तसंस्थेने 'बहुराष्ट्रीय दल आणि पर्यवेक्षणच्या (एमएफओ) सीनाई द्वीपावरील एका ऑपरेशनदरम्यान झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 6 अमेरिकन आणि दोन मित्र देशांचे दोन सदस्य यांचा मृत्यू झाला. यामुळे आम्ही दु: खी आहोत', असे गुरुवारी जाहीर केले.
पेंटागॉनचे मुख्य प्रवक्ते जोनाथन हॉफमन यांनी ट्वीट केले आहे की, पेंटॅगॉन एमएफओच्या संपर्कात आहे आणि घटनेच्या चौकशी करण्यास तयार आहे.
एका निवेदनात, एमएफओनेही या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इजिप्तच्या सिनाई द्वीपकल्पात झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात बहुराष्ट्रीय शांतता सेनेचे 8 सदस्य ठार झाले. ही दुर्घटना शर्म अल-शेखच्या आजूबाजूच्या परिसरातील रूटीन मिशन दरम्यान घडली.