ओस्लो - जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचे समजले जाणारे शांततेचे नोबेल पारितोषिक इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना जाहीर झाले आहे. इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांनी शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबरचा सीमावाद सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दोन्ही देशांमध्ये शांती नांदण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे अहमद अली हे लष्कराचे माजी अधिकारी आहेत.
इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना शांततेचे 'नोबेल' - Abiy Ahmed Ali gets noble for efforts to achieve peace and international cooperation
इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांनी शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबरचा सीमावाद सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे अहमद अली हे लष्कराचे माजी अधिकारी आहेत.
इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली
शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा नॉर्वेच्या संसदेकडून निवड करण्यात आलेल्या पाच सदस्यांची समिती करते. 'अहमद अली यांनी एरिट्रियाबरोबरचा वाद सोडवण्यासाठी अनेक स्तरावर चर्चा केली होती. लष्कराचे माजी अधिकारी राहिलेल्या अहमद अली यांनी देशात अनेक सुधारणा केल्या आहेत. इथियोपियाचे शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबर गेल्या 20 वर्षांपासून सीमावाद सुरू होता,' असे या ५ सदस्यीय नोबेल पारितोषिक समितीने म्हटले आहे.
TAGGED:
Nobel Peace Prize 2019