नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाविषाणूने थैमान घातले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनींशी कोरोना संकटावर चर्चा केली केली. कोरोनावर मात करण्यासाठी भारत युगांडाला शक्य तेवढ्या प्रमाणात मदत करेल, असे मोदी म्हणाले.
कोरोना संकट: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युगांडाचे पंतप्रधान योवेरी मुसेवेनींशी केली चर्चा - #COVID19 pandemic
युगांडा हा अफ्रिकेतील गरीब देश असून कोरोनाविरोधातील लढ्यात भारताने युगांडाप्रती मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक देशांच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली आहे.

युगांडा हा अफ्रिकेतील गरीब देश असून कोरोनाविरोधातील लढ्यात भारताने युगांडाला मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक देशांच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली आहे. मोदींनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांच्याहीशी आज चर्चा केली
कोरोना संकटामुळे जागतिक आरोग्य व्यवस्था आणि आर्थिक क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी काय उपाय योजावेत यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर चर्चा झाली.