अदिस अबाबा -आफ्रिका खंडात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संक्रमणांची एकूण संख्या 23 लाख 23 हजार 845 वर पोहोचली आहे. तर, 55 हजार 265 लोक मरण पावले आहेत. आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (आफ्रिका सीडीसी) ही माहिती दिली.
आफ्रिकेत कोरोनासंसर्ग झालेल्यांची संख्या 23 लाखांहून अधिक - Africa covid-19 death toll news
आफ्रिकन देशांवर सध्या सुरू असलेल्या साथीचे परिणाम असमान आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिका सीडीसीने म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, इजिप्त आणि इथिओपियाचा समावेश आहे.
![आफ्रिकेत कोरोनासंसर्ग झालेल्यांची संख्या 23 लाखांहून अधिक आफ्रिका लेटेस्ट कोरोना न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9866613-70-9866613-1607867933330.jpg)
आफ्रिका लेटेस्ट कोरोना न्यूज
आफ्रिका सीडीसीने म्हटले आहे की, संपूर्ण खंडात कोरोना संसर्गजन्य विषाणूची लागण झाल्यानंतर बरे होणार्या लोकांची संख्या आता 19 लाख 82 हजार 277 वर पोहोचली आहे.
आफ्रिकन देशांवर सध्या सुरू असलेल्या साथीचे परिणाम असमान आहेत. या पार्श्वभूमीवर आफ्रिका सीडीसीने म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, इजिप्त आणि इथिओपियाचा समावेश आहे.
हेही वाचा -इजिप्तमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू