सॅन फ्रॅन्सिस्को - कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये लागलेली आग अजूनही आटोक्यात आली नसल्याने पर्यावरण प्रेमींना चिंता लागली आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये चारी बाजूच्या २१ ठिकाणी ही आग धगधगत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी १३ हजार ८०० हून अधिक अग्निशामक दलाचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आग विझता विझेना, १ लाख २४ हजार एकर क्षेत्र भक्षस्थानी
ऑगस्ट महिन्यामध्ये मेंडोकिनो राष्ट्रीय जंगलात ३७ वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली भयानक आग थांबण्याचे नावच घेत नाही. ही आग आता १ लाख २४ हजार ०९२ एकर क्षेत्रात पसरली असून इतके प्रचंड क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने अमूल्य जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होत आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये मेंडोकिनो राष्ट्रीय जंगलात ३७ वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली भयानक आग थांबण्याचे नावच घेत नाही. ही आग आता १ लाख २४ हजार ०९२ एकर क्षेत्रात पसरली असून इतके प्रचंड क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने अमूल्य जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होत आहे. यातील ६७ टक्के आग फक्त शनिवारी सकाळी पसरली आहे, अशी माहिती कॅलिफोर्नियाच्या वानिकी आणि अग्नी सुरक्षा विभागाकडून देण्यात आली.
आगीच्या ज्वाळांमध्ये सध्या मेंडोकिनो, हम्बोल्ट, ट्रिनिटी, तेहामा, ग्लेन, लेक आणि कोलुसा यासारख्या ठिकाणचा भाग जळत आहे. १८ ते २० ऑगस्टच्या दरम्यान वीजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसानंतर जंगलामध्ये आग भडकण्यास सुरुवात झाली होती. वीज कोसळल्याने विविध ३७ ठिकाणी आग लागली. काही ठिकाणच्या आगी आपोआप विझल्या गेल्या मात्र काही ठिकाणच्या आगीने रौद्ररूप धारण केले असून जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे. आग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.