नैरोबी - सोमालियाची राजधानी असलेल्या नैरोबी येथे शनिवारी एका कार बॉम्बस्फोटात सैनिक ठार झाले एका लष्करी तळाच्या गेटजवळ हा बॉम्ब स्फोट झाला असून यात आणखी 14 जण जखमी झाले आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित अल-शबाब या दहशतवादी गटाने आपल्या रेडिओ आर्मद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
हा दहशतवादी गट बहुतेक वेळा मोगदिशूमधील लष्करी ठाण्यांना आपले लक्ष्य बनवतो आणि दक्षिण आणि मध्य सोमालिया मधील मोठ्या भागावर नियंत्रण ठेवून आहे. या गटाच्या दहशतवादी कारवायांमध्ये कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीमुळे काहीही फरक पडलेला दिसत नाही.
अल शबाब हा गट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन काळात अमेरिकन सैन्याच्या हल्ल्यांचे लक्ष होता गेल्यावर्षी या गटाच्या तळांवर जवळपास 63 हल्ले करण्यात आले मात्र आता सोमालिया मधील दहशतवादी गटांची कडील स्फोटके तयार करण्याची क्षमता वाढली आहे. ते महत्त्वाच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रवाशांना कर लावतात. तसेच येथील व्यापारही उधळून देत त्यांचे प्राणघातक कार्य करत आहेत.