टांझानिया - आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माऊंट किलिमांजारो येथे भीषण आग लागली आहे. येथे 500 स्वयंसेवक आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मैल अंतरावरूनही या आगीचे लोळ दिसत आहेत, असे टांझानियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा पर्वत गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे.
येथे 500 स्वयंसेवक कार्यरत असून त्यांना आगीचा फैलाव मर्यादित ठेवण्यात यश आले आहे, अशी माहिती टांझानिया राष्ट्रीय उद्यानाचे प्रवक्ते पास्कल शेलुटेटे यांनी दिली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे त्यांनी सांगितले. अजूनही जळत असलेल्या भागाला 'किफुनिका हिल' म्हणून ओळखले जाते, असे उद्यानातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.