बुर्किना फासो देशात दहशतवाद्यांचा भीषण हल्ला; ३५ मृत्यूमुखी, प्रत्त्युत्तरात ८० दहशतवाद्यांचा खात्मा - terrorist attak africa
आफ्रिका खंडाच्या पश्चिमेकडे असलेल्या बुर्किना फासो देशात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३५ नागरिकांचा मत्यू झाला आहे. तर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ८० दहशतवाद्यांचा खात्मा केला.
बुर्किना फासो- आफ्रिका खंडाच्या पश्चिमेकडे असलेल्या बुर्किना फासो देशात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३५ नागरिकांचा मत्यू झाला. तर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ८० दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही घटना देशाच्या उत्तरेकडील सोऊम प्रांतातील अरबिंदा या गावामध्ये मंगळवारी घडली.
या घटनेची माहिती देशाचे पंतप्रधान रोच मार्क काबोरो यांनी दिली. ३५ नागरिकांचा मृत्यू झाला त्यात महिलांची संख्या जास्त आहे. जवानांच्या धाडसी कामगिरीमुळे ८० दहशवाद्यांना ठार करता आले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात लष्करी सामुग्रीही जप्त करण्यात आली, अशी माहिती सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये देण्यात आली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणीही घेतली नाही. या क्रूर घटनेनंतर पंतप्रधानांनी देशात दोन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.