अदीस अबाबा :इथिओपिया देशामध्ये शनिवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. एका बसवर झालेल्या या हल्ल्यामध्ये सुमारे ३४ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशाच्या मानवाधिकार आयोगाने याबाबत माहिती दिली.
शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इथिओपियाच्या पश्चिमी भागातील बेनिशंगुल-गुमेज या राज्यामध्ये शनिवारी हा हल्ला झाला. हा हल्ला कशामुळे करण्यात आला, किंवा कोणत्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
देशांतर्गत हिंसाचाराने इथिओपिया त्रस्त..