महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

कोरोनामुळे राज्यात 126 पोलिसांचा मृत्यू, तर 9929 पोलीस कोरोनामुक्त - Corona pandemic in maha

सध्या राज्यात 2328 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 289 पोलीस अधिकारी, तर 2039 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 9929 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये 987 पोलीस अधिकारी तर 8942 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे राज्यात 126 पोलिसांचा मृत्यू, तर 9929 पोलीस कोरोनामुक्त
कोरोनामुळे राज्यात 126 पोलिसांचा मृत्यू, तर 9929 पोलीस कोरोनामुक्त

By

Published : Aug 17, 2020, 12:47 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र, या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करणारे महाराष्ट्र पोलीस दलाचे कोरोनयोद्धेही कोरोनाचे बळी ठरताना दिसत आहेत. आतापर्यंत राज्यात 126 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 12383 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 1287 पोलीस अधिकारी, तर 11096 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2328 पोलीस कर्मचारी हे कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 289 पोलीस अधिकारी, तर 2039 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत राज्यात 9929 पोलीस हे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये 987 पोलीस अधिकारी तर 8942 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 126 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये 11 पोलीस अधिकारी तसेच 115 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत कलम 188 नुसार, महाराष्ट्र पोलिसांनी 229645 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 827 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यभरात 333 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 888 आरोपींना पोलिसांना अटक केली आहे. राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 33 हजार 468 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.

आतापर्यंत पोलिसांनी 95821 वाहने जप्त केली असून तब्बल 21 कोटी 04 लाख 24 हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 89 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 66 घटना घडलेल्या आहेत .

ABOUT THE AUTHOR

...view details