कोल्हापूर - सकल मराठा समाज ( Sakal Maratha Samaj ) बुधवारी मुंबईत अण्णासाहेब पाटील महामंडळावर धडक देणार आहे. मराठा समाजासाठी उपयुक्त ठरलेल्या या महामंडळाकडून व्याज परतावे आणि नवीन कर्ज प्रकरणे मंजूर केली जात नसल्याचा ( Loan issues of Annasaheb Patil Mahamandal )आरोप मराठा समाजाचा आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी व वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन आर्थिक उन्नती मिळावी, मराठा समाजातील लोकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायाकरिता कर्ज दिले जाते. त्यामधून लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देशही असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून व्याज परतावा मिळत नसल्याने बँका नवीन कर्ज प्रकरणे उपलब्ध करून देत नाहीत. याचाच जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाज ८ डिसेंबर रोजी मुंबईतील अण्णासाहेब पाटील महामंडळावर धडक देणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील ( Maratha Kranti Morcha coordinator Dilip Patil ) यांनी सांगितले आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.