महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

आमचे वडील अजून जीवंत आहेत! मुखर्जींच्या मुलांनी अफवांवर नाराजी व्यक्त करत दिली माहिती - Abhijit Mukherjee

प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीट करून 'माझे वडील अजून जीवंत आहेत' समाज माध्यमावर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप करत त्यांनी माध्यमावरही नाराजी व्यक्त केली आहे.

आमचे वडील अजून जिवंत आहेत!  मुखर्जींच्या मुलांनी अफवांवर नाराजी व्यक्त करत दिली माहिती
आमचे वडील अजून जिवंत आहेत! मुखर्जींच्या मुलांनी अफवांवर नाराजी व्यक्त करत दिली माहिती

By

Published : Aug 13, 2020, 12:12 PM IST

नवी दिल्ली- भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांची प्रकृती सध्या अत्यवस्थ आहे. मात्र, समाज माध्यमातून त्याचे निधन झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. यावर प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी आणि कन्या शर्मिष्ठा यांनी नाराजी व्यक्त करत वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्वीट करून 'माझे वडील अजून जीवंत आहेत' समाज माध्यमावर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोप करत त्यांनी माध्यमावरही नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी देखील वडलांची तब्येत ठीक आहे. विशेषतः माध्यमांनी उगाच अफवा पसरवू नये आणि विनाकारण कॉल न करण्याबाबतही त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

तसेच आर्मीच्या रुग्णालय प्रशासनाकडूनही प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे, आज सकाळ पर्यंत त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही, त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

10 ऑगस्टला मुखर्जी यांची तब्येत अचानक ढासळली होती. त्या नंतर त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.- आर्मी रिसर्च अँड रेफर हॉस्पिटल मध्ये त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची तब्येत सध्या गंभीर असल्याचे सुत्रांनी सांगितले. तत्पूर्वी प्रणव मुखर्जी यांची कोरोना टेस्ट ही ही पॉझिटिव्ह आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details