महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

BULLET TRAIN गुजरातमधील वापीजवळ कॉरिडॉरवर उभारला सुमारे 12 मीटर उंचीचा खांब! - नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन

कॉरेडोरवर सुमारे 12 ते 15 मीटर उंच खांब बांधण्यात आला आहे. ही उंची जवळपास 4 मजली इमारतीएवढी आहे.

मुंबई अहमदाबाद मेट्रो
मुंबई अहमदाबाद मेट्रो

By

Published : Jul 31, 2021, 5:00 PM IST

Updated : Jul 31, 2021, 5:15 PM IST

मुंबई -मुंबईवरून अहमदाबाद जणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात झाली आहे. गुजरातमधील वापीजवळ चॅनेज 176 येथे पहिला उंच खांब निर्माण करण्यात आला आहे. हे कामन नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने केले आहे.

कॉरेडोरवर सुमारे 12 ते 15 मीटर उंच खांब बांधण्यात आला आहे. ही उंची जवळपास 4 मजली इमारतीएवढी आहे. या खांबाच्या कामासाठी 183 घन मीटर काँक्रीट आणि 18.820 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या खांबाचे काम महत्त्वपूर्ण असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने म्हटले आहे.

हेही वाचा-व्यापाऱ्यांनो जीएसटी कर भरू नका..; पंतप्रधानांच्या बंधूंचा अजब सल्ला

बुलेट ट्रेनकरिता गुजरातमधील काम अगोदर सुरू

पुढील तीन महिन्यात महाराष्ट्रातील जमीनीचा वाद मिटला नाही, तर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या गुजरातमधील भागाचे काम अगोदर सुरू करण्यात येईल, असा इशारा नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) मार्च 2021 मध्ये दिला होता. प्रकल्प अधिकारी अचल खरे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य नाही. गुजरातमधील याबाबतच्या पायाभूत सुविधा या 2024 पर्यंत पूर्ण होतील.

हेही वाचा-एटीएममधून पैसे काढणेही होणार महाग; आरबीआयने बँकांना 'ही' दिली परवानगी

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमीनीपैकी, गुजरातमधील 95 टक्के जागा ताब्यात घेण्यास एनएचएसआरसीएलला यश मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्रातील केवळ 23 टक्के जागाच कंपनीने ताब्यात घेतली आहे. या बुलेट ट्रेनचा 352 किलोमीटर भाग हा गुजरातमधील आहे, तर 156 किलोमीटर भाग हा महाराष्ट्रातील आहे. गुजरातमधील उर्वरित पाच टक्के जमीन ही आम्ही जूनपर्यंत ताब्यात घेऊ असे खरे यांनी सांगितले. तर पुढील तीन महिन्यात महाराष्ट्रातील 70 ते 80 टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली, तर दोन्ही ठिकाणचे प्रकल्प एकत्रच सुरू करता येतील असेही ते म्हणाले. जर तसे नाही झाले, तर गुजरातमधील काम अगोदर सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

असा आहे बुलेट ट्रेन प्रकल्प-

  • मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रोजेक्ट (एमएएचएसआरपी) हा 508 किलोमीटरचा आहे. प्रकल्पामध्ये केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश आहे.
  • बुलेट रेल्वेचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास 320 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे धावणार आहे.
  • बुलेट रेल्वे संपूर्ण अंतर 2 तासात पूर्ण करणार आहे. तर सर्व स्थानकांवर रेल्वे थांबल्यास तीन तासात अंतर पूर्ण करणार आहे.
  • राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 63 टक्के जमीनेचे अधिग्रहण केले आहे. प्रकल्पासाठीची गुजरातमधील 77 टक्के जमीन , दादर नगर हवेलीमधील 80 टक्के जमीन आणि महाराष्ट्रातील 22 टक्के जमीन लागणार आहे.
  • मात्र, महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी यासारख्या भागात भूमी अधिग्रहण करण्याबाबत अद्यापही अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीची आर्थिक आणि तांत्रिक मदत जपान करणार आहे.
  • जूनपर्यंत प्रकल्पावर 3 हजार 226 कोटी रुपये खर्च झाला आहे.
Last Updated : Jul 31, 2021, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details