महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

21 वर्षीय तरुणीला एनसीबीने केली अटक; इन्स्टाग्रामवर करायची ड्रग्जची विक्री - drugs selling on instagram

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री करणाऱ्या 21 वर्षीय इकरा कुरैशीला एनसीबीने अटक केली आहे. मागील तीन महिन्यांपासून तिच्यावर पाळत ठेवली जात होती. पण दरवेळी ती पळ काढण्यास यशस्वी ठरली. मात्र, अखेर एनसीबीने तिला मुंबईच्या डोंगरी परिसरातून अटक केली.

Ekara Kuraishi
इकरा कुरैशी

By

Published : Apr 8, 2021, 4:41 PM IST

Updated : Apr 8, 2021, 6:00 PM IST

मुंबई - इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ड्रग्जची विक्री करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला एनसीबीने अटक केली आहे. इकरा कुरैशी असे या तरूणीचे नाव असून एनसीबीने तिला मुंबईच्या डोंगरी परिसरातून अटक केली आहे. एनसीबीने तिच्याकडून दीड लाख रुपयांची रोकड आणि एमडी ड्रग्ज जप्त केले.

इकरा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवत होती. ती नव्या ग्राहकांशी संपर्क करायची आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करत होती. तिने ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी पाच ते सहा महिलांची निवड केली होती. ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांना ड्रग्जच्या डिलिव्हरीसाठी पाठवले जात होते.

चिंकू पठाण गॅंगशी सबंध

21 वर्षीय इकरा ही चिंकू पठाण गँगमधील लोकांसोबत काम करत असल्याची माहिती पुढे येत आहे. मागील तीन महिन्यांपासून तिच्यावर पाळत ठेवली जात होती. पण दरवेळी ती पळ काढण्यास यशस्वी ठरली. मात्र, अखेर एनसीबीने तिला मुंबईच्या डोंगरी परिसरातून अटक केली.

Last Updated : Apr 8, 2021, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details