तिरुवनंतपूरम - गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडल्याने सखल भाग पाण्याखाली बुडाले आहेत. केरळच्या पथानमथिट्टा जिल्ह्यात आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पंबा धरणाची पाणी पातळी सध्या 983.05 एवढी आहे. येत्या एका तासात पाणी पातळीत 983.50 मीटरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 984.5 मीटरपर्यंत पाणी पातळीत वाढ झाल्यावर रेड अलर्ट घोषित केला जाणार आहे. तसेच 985 मीटरपर्यंत पाणी भरल्यावर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.