महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / headlines

कोरोना इफेक्ट : इंडियन मिलिटरी अ‌ॅकॅडमी यंदा पासिंग आऊट परेडच्या परंपरा तोडणार - IMA Dehradun news

आज आयएमएच्या पासिंग आउट परेडमध्ये 423 क‌ॅडेट्स सहभागी होतील. यामध्ये 333 भारतीय कॅडेट्स आणि 90 परदेशी कॅडेट्स सहभागी होतील.

आयएमए डेहराडून न्यूज
आयएमए डेहराडून न्यूज

By

Published : Jun 13, 2020, 8:59 AM IST

डेहराडून - इंडियन मिलिटरी अ‌ॅकॅडमीच्या (IMA) 88 वर्षांच्या गौरवपूर्ण इतिहासात आज एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे आयएमएच्या इतिहासातील अनेक परंपरा तोडल्या जाणार आहेत. तर, काही नव्या परंपरा सुरू होणार आहेत. आयएमएची पासिंग आऊट परेड केवळ औपचारिकता म्हणून केली जाईल आणि या कार्यक्रमासाठी क‌ॅडेटसच्या कुटुंबीयांना निमंत्रण दिले जाणार नाही, असे पहिल्यांदाच होणार आहे. आज आयएमएच्या पासिंग आउट परेडमध्ये 423 क‌ॅडेट्स सहभागी होतील. यामध्ये 333 भारतीय कॅडेट्स आणि 90 परदेशातील कॅडेट्स सहभागी होतील.

आयएमए डेहराडून न्यूज

आज इंडियन मिलिटरी अकॅडमीतून उत्तीर्ण होऊन 333 शूर कॅडेट्स भारतीय सैन्यात अधिकारी बनतील. पासिंग आऊट परेडमध्ये मोठ्या संख्येने देशातील आणि परदेशातील तरुण कॅडेट्स पास आऊट होतात. केवळ कॅडेट्सचे कुटुंबीयच नव्हे; तर, देश आणि परदेशातील अनेक मान्यवर ही परेड पाहण्यासाठी येतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे पहिल्यांदाच पीओपी अंतर्गत होणारे विविध कार्यक्रम मर्यादित करण्यात आले आहेत. आज होणाऱ्या पासिंग आऊट परेडदरम्यान प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या असतील. मात्र, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून कुटुंबीय त्यांच्या मुलांची परेड घरात बसून पाहू शकतील.

कोणकोणत्या परंपरा मोडल्या जाणार

1. आयएमएच्या कठीण प्रशिक्षणानंतर पासिंग आऊट हा कॅडेटससाठी भावूक करणारा क्षण असतो. या वेळी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या वर्दीवर रँक लावतात. मात्र, या वेळी पहिल्यांदा पीओपी कार्यक्रमादरम्यान सैन्याचे अधिकारीच कॅडेट्सच्या वर्दीवरती रँक लावतील आणि त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका पार पाडतील.

2. यावेळी कॅडेटस चॅटवूड बिल्डींगपासून अकॅडमीतले आपले शेवटचे पाऊल टाकत करिअरचे पहिले पाऊल टाकतील. या अंतिम पावलासोबत अधिकार्‍यांना त्यांच्या रेजिमेंटपर्यंत सोडण्यात येईल.

3. यासोबतच या वेळच्या पासिंग आऊट परेडमध्ये केडेटसवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. आयएमएच्या पासिंग आऊट परेडच्या कार्यक्रमात शपथ घेतल्यानंतर कॅडेट्स पुश-अप करून एकमेकांचा उत्साह वाढवत असताना पाहणे हा सोहळा काही वेगळाच असतो. मात्र, कोरोना विषाणू आणि सोशल डिस्टंसिंगमुळे कदाचित हा सोहळा या वर्षी पाहायला मिळणार नाही, असे दिसते.

4. यंदा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपनी आणि केडेटला मेडल स्पर्श न करू देण्याची व्यवस्था केली आहे.

असा आहे इतिहास

1 ऑक्टोबर 1932 मध्ये 40 कॅडेट्स सह आयएमएची स्थापना झाली होती. 1934 मध्ये इंडियन मिलिटरी अ‌ॅकॅडमीमधून पहिली बॅच पास आऊट झाली होती. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाचे हिरो राहिलेले भारतीय सेनेचे पहिले फील्ड मार्शल जनरल सॅम माणेकशॉ हेही या अकॅडमीचे विद्यार्थी राहिले होते. इंडियन मिलिटरी अ‌ॅकॅडमीमधून देश आणि परदेशांच्या सैन्यांना 62 हजार 139 अधिकारी मिळाले आहेत. यामध्ये मित्र देशांचे 2 हजार 413 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अ‌ॅकॅडमीमध्ये दरवर्षी जून आणि डिसेंबरमध्ये पासिंग आऊट परेडचे आयोजन केले जाते. यादरम्यान अंतिम पाऊल पार केल्यानंतर कॅडेटस सेनेमध्ये अधिकारी बनतात.

किती राज्यांमधून किती कॅडेट्स

या वेळी, भारतीय सैन्याला 333 अधिकारी मिळणार आहेत. उत्तर प्रदेशातून 66, हरियाणामधून 39, उत्तराखंडमधून 31, बिहारमधून 31, पंजाबमधून 25, महाराष्ट्रातून 18, हिमाचल प्रदेशातून 14, जम्मू-काश्मीरमधून 14, राजस्थानातून 13, मध्यप्रदेशातून 13, केरळमधून 8, गुजरातमधून 8, दिल्लीतून 7, कर्नाटकातून 7, पश्चिम बंगालमधून 6, आंध्र प्रदेशातून 4, छत्तीसगडमधून 4, झारखंडमधून 4, मणिपूरमधून 4, चंदीगडमधून 3, नेपाळमधून 3, आसाममधून 22, तमिळनाडूमधून 2, तेलंगाणातून 2, मेघालय, मिझोरम आणि लडाखमधून प्रत्येकी एक कॅडेट यंदा पास आऊट होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details