जुन्नर (पुणे) - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज किल्ले शिवनेरी गडाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोलीस तर गडाच्या पहिल्या दरवाज्यावर वनविभागाचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन या दौऱ्यात करण्यात येत असून गडाच्या पायथ्यापासून कोश्यारी यांचा पाहणी दौरा सुरू होत आहे.
किल्ले शिवनेरी हा गड जंगल परिसराचा असून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाचे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात आहेत. गडाच्या पायथ्यापासून माहिती फलक नव्याने लावण्यात आले आहेत. गडाच्या पहिल्या दरवाज्यावरून गडाची माहिती घेऊन राज्यपाल शिवाई देवी मंदिरात दर्शन घेतील. तिथून ते पायी प्रवास करत किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होणार आहेत.