वॉशिंग्टन डी. सी. - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 5 लाख 626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
तब्बल 180पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, आतापर्यंत 54 लाख 53 हजार 247 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 लाख 626 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 75 हजार 111वर पोहचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.